
डॉक्टर्सना देवाची उपमा देतात काहीजण आणि काही डॉक्टर्स या उपमा खर्याही करतात, कल्याणीज डेन्टल क्लिनिक मुळं खरंच माझ्या मुलीला नविन आयुष्य दिलं, सुंदर आणि उच्चशिक्षित असून दातांच्या दिसण्यामुळे तिचा कॉन्फिडन्स खूपच कमी झाला होता चार चौघात ती मोकळेपणानं हसायची सुद्धा नाही, डॉक्टरनी यावर उत्तम उपचार तर केलाच पण अगदी पाहिल्याच भेटीत डॉक्टर्सनी तिचा कॉन्फिडन्स परत आणला.
डॉ. कल्याणी यांचं कौन्सलिंग खरंच खूप छान आहे, त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा !!
श्री. अनिल निरवाणे, सांगली

डॉ. कल्याणी यांचा हसतमुख चेहरा, प्रसन्न व्यक्तिमत्व, बोलण्याची लकब आणि मैत्रीपूर्ण वागणे हि त्यांची महत्वपूर्ण शैली आहे. लहानात लहान आणि मोठ्यात मोठे होऊन फॅमिली डेंटल क्लिनिक मध्ये सर्वांच्या सेवेला सज्ज असते दातांच्या कोणत्याही समस्येनंतर जे समाधान हवं असत ना ते, फॅमिली डेंटल क्लिनिक मध्ये नक्की मिळत.
प्रियांका आडके, जयसिंगपूर

उत्कृष्ठ पद्धतीचे काम, नम्र व तत्पर सेवा, योग्य आकारणी, योग्य सल्ला, लेटेस्ट टेकनॉलॉजी, प्रॅक्टिकलचा अप्रतिम अनुभव,कामाची १००% हमी.
राहुल शहा, केशरभवानी ट्रेडिंग, सांगली

व्यवसायामुळे खूपदा शरीरकडे दूरलक्ष्य, होतंच, आणि वेळ नाही वागेरे अशी कारणं हा त्रास आणखी वाढवतात, दुसरं आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला आपेक्षित अशी सर्व्हिस, एक्स्पर्टीज पण शोधणं अवघड बर्याच वाईट अनुभवानंतर मी इथं आलो आणि हे आमच्या संपूर्ण फॅमिलीचं फॅमिली डेन्टल क्लिनिक झालं, इथला प्रोफेशनलपणा, स्टाफ कडून मिळणारी वागणूक आणि डॉक्टर्सची न कंटाळता प्रश्नांचे समाधान करण्याची पद्धत अतिशय सुंदर, आणि त्याचमुळे आम्हाला 60-70 किलोमीटर दुरून इथं येण्याचं काहीच वाटत नाही.
श्री. अशोक पाटील, सांगली

डॉ. कल्याणीच्या हातांनी जेंव्हा दाढ दुखीवर उपचार झाले तेंव्हा दुखण्यावर हळुवार फुंकर घटल्याचीच अनुभूती आली. असेही उपचार करता येतात हे सिद्ध करणारी हि दंत वैद्य, म्हणूनच तिमाझी दांत वैद्य असल्याचा मला अभिमान वाटतो. तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी उदंड शुभेच्छा.
श्री सदानंद कदम (शिक्षक,इतिहास अभ्यासक), सांगली

मॅडम सर्व माहिती सुरवातीलाच देतात त्यामुळे पेशेंटच्या मनातील सर्व भीती पूर्णपणे निघून जाते. डॉक्टरांचे या क्षेत्रातील प्रभुत्व, तंत्रशुद्ध कौशल्य तसेच क्लिनिक मधील स्वच्छता व स्टाफचे नम्र आचरण या गोष्टींचे कौतुक वाटते.
योगेश विजय लाड, पार्थ इंडस्ट्रीज, सांगली

कोणत्याही उपचारापेक्षा उपचार करणार्याची पद्धत, बोलणं आणि एकूणच एनवायरमेंट हे पेशंटला बरं खूप प्रभावित करतं, इथं सेंम अस्सच आहे, आईचं ऐकून पुण्यातून येऊन इथं उपचार घेणं मला खरंतर फारसं पटलं न्हवतं, पण माझा हा निर्णय योग्यच होता, डॉक्टर उपचार तर छान करतातच पण पेशंटला समजून त्याप्रमाणे कस्ट्माइज्ड कौन्सलिंग करण्याची त्यांची जी पद्धत आहे ती केवळ अप्रतिम. एकदम प्रोफेशनल अँम्बियन्स, हाय टेक इक्विपमेंट्स, इन्फॉर्मल आणि आपुलकीची ट्रीटमेंट, आणि संपूर्ण टिम ची एक्स्पर्टीझ एकदम ग्रेट !!
महेश कुलकर्णी, सांगली

कल्याणीज डेन्टल क्लिनिक हे खरंच उत्तम डेन्टल क्लिनिक आहे, माझ्या छोट्याश्या परीला दातांच्या काही प्रॉब्लेम्स मुळे खूपच त्रास होत होता, आणि पाणी मात्र आमच्या डोळ्यात येत होते, पण इथं रिसेप्शन पासून डॉक्टर्स पर्यन्त सर्वांनी तिला इतकं छान हॅंडल केलं, आणि तिला कोणताही त्रास न जाणवता ट्रीट ही केलं, हे सगळं खूपच कौतुकास्पद होतं, संपूर्ण टिम चे खूप खूप आभार..!!
मीनल पाटील , सांगली

आमचा चांगल्या डेंटिस्ट् चा शोध ९-१० वर्षांपूर्वी मॅडम भेटल्यावर थांबला. मृदुभाषी न कंटाळता पेशेंट च्या प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या अश्या मॅडम. आपणास पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा..!
डॉ. रश्मी शहा, सांगली